Tuesday, March 02, 2010

विनितच्या व्हिसाची कथा आणि आमची व्यथा

खूप दिवसापासून मला हा अनुभव तुम्हा सर्वांबरोबर शेअर करण्याची इच्चा होती. आज तो योग आलाय. म्हणतात ना "देर आये पर दुरुस्त आये". असू दे आजही तो दिवस माझ्या व्यवस्थित स्मरणात आहे. विनितचा व्हिसा interview सोमवारी होता.जो कोणी विनीतला ओळखतो त्याला लगेचच समजेल कि विनीत दोन तीन मित्रांना बरोबर घेवून गेला असेल. ते दोन मित्र होतो मी आणि आशिष. आम्ही शनिवारी मुंबयीची ३ तीकेटे बुक केली "नीता वोल्वोची".

रूममधून निघालो. थेट travels कडे जाने अपेक्षित होते आम्हाला. विनितने वेळेवर रंग दाखवलेच. पण अपेक्षित प्रमाणे घडेल असेल असे विनिताच्या बाबतीत क्वचितच घडते. विनीत रेसुमे ची प्रिंट काढायला विसरला होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे लाईट नवती. Parallel प्रोसिस्सिंग चालू केली आम्ही. दोन नेट कॅफे मध्ये प्रिंट try करत होतो. फायनली एका ठिकाणी प्रिंट निघाली. एवढे सगळे करून आम्ही निघालो travels कडे. रविवारी पाच वाजताची बस होती.नेहमीप्रमाणे (?) आम्ही वेळेवर पोहोचलो. फक़्त विसरलो ती तीकेटे. आम्ही बराच वेळ त्या travels वाल्याशी वाद विवाद घातला. पण व्यर्थ. शेवटी मी आणि आशिष तीकेटे शोधण्यासाठी निघालो. तीकेटे प्रिंट काढण्याच्या प्रकारात गहाळ झाली होती. अखेरीस ती सापडली. अक्षरश जीव भांड्यात पदला आमचा. तीकेटे दाखवून प्रवास चालू झाला. काहीही विघ्न न येता आम्ही घाटकोपरला पोहोचलो.

एका उडपी हॉटेल मध्ये जेवण केले. मुक्काम माझ्या मावशीकडे करायचे ठरले. व्यवस्थित ए.सी. ची सोय असल्यामुळे झोप चांगली झाली. सोमवारचा दिवस सकाळी ४ पासूनच सुरु झाला. चहा घेवून आम्ही निघालो महालक्स्मिला ट्याक्सीतून आम्ही व्हिसा ऑफिस ला पोहोचलो. ऑफिस उघडले नसल्यामुळे आम्ही थोडा वेळ टायिम पास केला. ऑफिस उघडल्या नंतर आम्हाला कळले कि invitation लेटर हि हवे असते. आणि नेहमीप्रमाणे विनीत ने ते आणले नवते. मग मी आणि आशिष त्या अपरिचित शहरात सकाळी आठ वाजता नेट क्याफे शोधात फिरत होतो कधी taxi तून कधी पायी. पण व्यर्थ. एकही नेट कॅफे उघडे नवते.मग विनीत ने फोने करून कळवले कि तो ऑफिस मधील सेक्युरिटी प्रिंट काढून द्यायला तयार झाला होता. मग आम्ही निघालो परत व्हिसा ऑफिस कडे. विनीत ने ऑफिस मiध्ये डॉक्युमेंट जमा केले. आम्ही लंच केला. त्या नंतर मी आणि आशिष महालक्ष्मी मंदिर फिरलो . मग यु स consulate ऑफिस जवळ गेलो. पहिली चांगली आणि महत्वाची गोष्ट घडली ती व्हिसा मिळण्याची. मग आम्ही खूपच निवांत झालो. आम्ही दादर आणि नरीमन पोइंत फिरलो. बोटिंग हि केली. मग आम्ही निघालो परत दादर ला . तिघेही खूप आनंदात होतो. स्न्याक्स साठी बस एका हॉटेल जवळ थांबली. ती १५ मिनिटांसाठीच. बहुतेक आम्ही इतक्या आनंदात होतो कि आम्हाला ४५ मिनिटे कशी गेली ती कळलीच नाही आणि बस कधी गेली हे हि. मग मात्र आम्ही थोडे घाबरलो. ९-९:३० वाजले होते. विनीत ची कागद पत्रे हि बस बरोबर गेली होती. मग मेन ऑफिस ला फोन करून कागद पत्रे जमा करून घेण्यास सांगितली. एक शेवटची नीता वोल्वो येणार होती. तीत बसून आम्ही पुण्याला परतलो. ऑफिस मधून कागद पत्रे घेतली आणि रूम वर पोहोचलो.

ह्या सर्व घडलेल्या गोष्टीवर आम्ही खूप वेळ हसत होतो. आणि ह्या सर्व प्रसंगावर blog लिहिण्याचे ठरवून आम्ही झोपी गेलो.